डॉ. मुकुल खुटाळे यांची खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाबरोबर फिजिओथेरपिस्टपदी नियुक्ती


दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
केंद्र सरकारच्या क्रीडा विभागामार्फत पाचव्या खेलो इंडिया गेम्स २०२२ अंतर्गत मध्य प्रदेश भोपाळ येथे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमधील कानोईग अँड कयाकिंग या खेळ प्रकारासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुयाचे सुपुत्र डॉटर मुकुल महेश खुटाळे यांची क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणेचे आयुक्त यांनी फिजिओथेरपिस्टपदी नियुक्ती केलेली आहे.

डॉटर मुकुल खुटाळे यांनी यापूर्वी हॉकी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहिलेले असून भारतीय खो-खो संघाच्या फिजिओथेरपीस्टपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

डॉटर मुकुल खुटाळे यांची महाराष्ट्र संघाच्या फिजीओथेरपीस्टपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विविध स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!