दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२३ । मुंबई । फिनटेक क्षेत्रात अधिक प्रयत्न करण्यास सज्ज असलेली एंजल वन लि. ने धोरणात्मक उपक्रमांचे कार्यकारी संचालक म्हणून अमित मजुमदार यांची नियुक्ती केली आहे. फिनटेक उद्योगात एंजल वनचे स्थान आणखी मजबूत करण्याची आणि कंपनीच्या वाढीला गती देण्यासाठी धोरणात्मक पुढाकार घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
व्यवसाय धोरण व वाढ, विलीनीकरण व अधिग्रहण, कार्यसंचालन, जोखीम आणि अनुपालन यामधील कौशल्यांसह अमित यांना वित्तीय सेवा उद्योगाचा व्यापक अनुभव आहे. विविध बाजारपेठ डायनॅमिक्स, व्यवसाय प्रक्रियेची पुनर्रचना आणि मोठ्या संघांचे व्यवस्थापन या अंतर्गत रिटेल स्केल फायदेशीरपणे तयार करण्याचा त्यांचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे.
अमित यापूर्वी २०१४-१५ दरम्यान एंजल वन लिमिटेडशी संलग्न होते. ते कार्यकारी संचालक व मुख्य धोरण अधिकारी होते आणि त्यांनी शाश्वत फायदेशीर वाढ साध्य करण्यासाठी सर्व व्यवसाय कार्यांमध्ये सुरळीत व स्केलेबल ऑपरेशन्स सक्षम करण्यासाठी योगदान दिले.
एंजल वन लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘झपाट्याने विकसित होत असलेल्या बाजारपेठ डायनॅमिक्ससह आम्ही चपळ व सक्रिय दृष्टीकोन असण्याचा निर्धार केला आहे. अमित यांचा व्यापक अनुभव व धोरणात्मक कौशल्य आमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, जेथे आम्ही भारतातील सर्वात विश्वसनीय फिनटेक व्यासपीठ बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांच्या नेतृत्वांतर्गत अनेक विकास संपादित करण्यास उत्सुक आहोत.’’
एंजल वन लि. येथील धोरणात्मक उपक्रमांचे कार्यकारी संचालक श्री. अमित मजुमदार म्हणाले, ‘‘एंजल वनने फिनटेकमध्ये स्वत:ला लीडर म्हणून स्थापित केले आहे. मी पुन्हा एकदा कंपनीच्या धोरणात्मक उपक्रमांप्रती योगदान देण्यास आणि कंपनीच्या विकासाला अधिक चालना देण्यास उत्साहित आहे. मी आमची ध्येये संपादित करण्यासाठी आणि आमचे क्लायण्ट्स व इतर भागधारकांकरिता मूल्य वितरित करण्यासाठी प्रतिभावान टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. एंजल वनला त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजना ओळखण्यास सक्षम करण्याची ही उत्तम संधी आहे.’