जी.डी.सी. अ‍ॅण्ड ए. परीक्षेसाठी 17 मार्चपर्यंत अर्ज करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। सातारा। जी.डी.सी. अ‍ॅण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षा, 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 मार्चच्या रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.24 मार्च 2025 पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अ‍ॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अ‍ॅण्ड ए.) परीक्षा-2025 व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-2025, दिनांक 23, 24 व 25 मे, 2025 रोजी घेण्यात येणार असल्याचेही श्री. सुद्रिक यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!