स्थैर्य, फलटण, दि. २० : सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्याच्या निंबळक भागांमध्ये रानगव्याने दर्शन दिल्यामुळे निंबळकसह पंचक्रोशी मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी निंबळक गावाच्या हद्दीमध्ये रानगव्याने प्रवेश केला असल्याबाबतची माहिती निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान कळस्कर यांना मिळाली. रानगवा निंबळक परिसरामध्ये आला असल्याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाल्यानंतर पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी त्वरित काही युवकांसह रानगवा असल्याच्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी त्वरित संबंधित माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली व त्यानंतर वनविभागाने तेथे भेट दिली असता सदरील ठिकाणाहून रानगवा मार्गस्थ झाले असल्याची खात्री वनविभागाने केली.
निंबळक व परिसरामध्ये रानगवा असल्याने निंबळक सह निंबळक पंचक्रोशी मध्ये वनविभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती साठी स्पीकर द्वारे माहिती सांगण्यात आली.