कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी व उद्योजकांनी कौशल्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० मार्च २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही राज्यातील कौशल्य विकासाची शिखर संस्था असून राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेचे प्रमाण वाढवणे हे या संस्थेचे ध्येय आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाते व त्यांना रोजगारांची संधी देखील प्राप्त करुन देण्यात येते. तरी या क्षेत्राशी निगडीत असलेल्या किंवा काम करण्यास इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्थांना व उद्योजकांना  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीबरोबर सामंजस्य करार करायचा असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा येथे भेट द्यावी किंवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु.श. पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!