साहित्य संमेलनासाठी ’होम स्टे’ साठी इच्छुकांनी संपर्काचे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. 13 डिसेंबर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. या संमेलनात परगावाहून येणारे लेखक, रसिक यांच्यासाठी ’होम स्टे’ संकल्पना राबवण्यात येणार आहे, त्यासाठी इच्छुकांनी दि.10 डिसेंबर 2025 पर्यंत संमेलनाच्या राजपथावरील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन 99 वे संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.

पत्रकात, साता-यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे होण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. संमेलनात नाविन्यूपर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. संमेलनासाठी येणार्‍या रसिकाची, लेखकांची संख्या लक्षात घेता त्याची गैरसोय होऊ नये यासाठी होम स्टे ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. संमेलनासाठी परगावाहून येणारे लेखक, रसिक यांच्या निवासाची व्यवस्था आपल्या घरात, बंगल्यात करण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल त्यांनी संमेलनाच्या राजपथावरील कार्यालयात दि.20 डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.

 

सातार्‍यात 1993 साली संमेलन झाले होते त्यावेळीही अनेक साहित्यिक, रसिकांची निवासाची सोय करण्यासाठी अनेक सातारकर सहभागी झाले होते. त्यानंतर आता 32 वर्षानंतर सातार्‍यात होणार्‍या 99 व्या संमेलनासाठी सातारकरांनी मोठ्या संख्येने या संकल्पनेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यामध्ये आपल्या घरी ज्या लेखकांची अगर रसिकांची निवास व्यवस्था असेल त्यांची चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था आपणाकडे असणार नाही. फक्त अंथरुण, पांघरुण तसेच स्नानाची व्यवस्था विनामूल्य पध्दतीने करायची आहे. ज्यांची या उपक्रमास संमती असेल त्यांनी श्रीराम नानल (9423034050), पद्माकर पाठकजी (888801443) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!