राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । मुंबई । राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थ्याची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, हयातीचा दाखला व मानधन जमा होत असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या छायांकित प्रती तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी जाऊन जमा करावेत, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील लाभार्थ्यांनी आपली माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, मुंबई -32 या ठिकाणी द्यावी किंवा dcamandhan@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!