दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी हवामान आधारीत प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यासाठी सन 2021-22 मधील आंबिया बहारातील डाळींब, द्राक्ष, केळी, आंबा व स्टॉबेरी पीकाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ही योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी हंगामनिहाय पीके, संरक्षित रक्कम, विमा हप्ता व सहभागाची मुदत होण्याची मुदत गावपातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.