स्थैर्य, सातारा, दि. 25 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा आणि गट व्याज परतावा योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये रु.१,००,०००/- पर्यंतच्या प्रकल्प मर्यादेची १) थेट कर्ज योजना (नियमित कर्ज परतफेड केल्यास बिनव्याजी कर्ज) २) रु. ५,००,०००/- पर्यंतच्या प्रकल्प मर्यादेची २० टक्के बीज भांडवल योजना (महामंडळाच्या रक्कमेवर व्याजदर ६ टक्के वार्षिक) ३) बॅकेमार्फत राबविण्यात येणारी रु.१०,००,०००/- प्रकल्प मर्यादेपर्यत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून घेतलेले नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याज परतावा महामंडळाकडून) ४) बॅकेमार्फत राबविण्यात येणारी रु.५०,००,०००/- प्रकल्प मर्यादेपर्यत गट कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून घेतलेले नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याज परतावा महामंडळाकडुन) अशा एकूण चार प्रामुख्याने राबविण्यात येत आहेत. बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील १८ ते ५० वयोगटामधील ज्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- आत आहे असे अर्जदार पात्र आहेत.
थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील १८ ते ५५ वयोगटामधील ज्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- आत आहे व ज्यांचा सिबील स्कोअर किमान ५०० आहे असे अर्जदार पात्र आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील १८ ते ५० वयोगटामधील ज्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८,००,०००/- आत आहे असे अर्जदार पात्र आहेत. गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील १८ ते ४५ वयोगटामधील ज्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८,००,०००/- आत आहे असे अर्जदार पात्र आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट व्याज परतावा योजना पूर्णपणे ऑनलाईन असून अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रंसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
तरी इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीस्तव इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा मूळ जातीचा दाखला व आधार कार्डसह जिल्हा कार्यालयामध्ये स्वतः वैयक्तिक स्वरुपामध्ये पुढील पत्यावर संपर्क साधावा.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास हामंडळ (मर्यादित) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, खोली नं.३, सर्व्हे नं.२२/अ, जुना एम.आय.डी. सी.रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा दुरध्वनी क्रमांक ०२१६२२९५१८४.