मसाप, शाहूपुरी शाखेच्या साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन


स्थैर्य, 4 फेब्रुवारी, सातारा : मसाप, पुणे शाहूपुरी शाखेच्यावतीने सातारा जिल्हयातील लेखकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा गौरव व्हावा यासाठी दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्षे असून 2025 च्या पुरस्कारासाठी लेखकांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत साहित्य पाठवण्याचे आवाहन मसाप, पुणे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.

मसाप, शाहूपुरी शाखेने साहित्य पुरस्कार गेल्यावर्षीपासून सुरु केले. शाखेतर्फे सातारा जिल्हयातील उत्तम साहित्यकृतींना श्री.छ. थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार सातारा जिल्हयातील ज्येष्ठ साहित्यिकास दिला जाईल. रोख रक्कम, शाल व सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार, बा.सी.मर्ढेकर कविता पुरस्कार, रा.ना.चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार चरित्र, आत्मचरित्र, ललित लेखन, प्रवास वर्णन साठी दिला जातो.

या पुरस्काराचे वितरण प्रतिवर्षी शाहूपुरी शाखेच्या वर्धापनदिन समारंभारत मान्यवरांच्या हस्ते केले जाते. 2025 च्या पुरस्कारासाठी इच्छुकांनी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या वर्षात प्रसिध्द झालेले पुस्तक पाठवावीत. पुरस्कारासाठी या काळात प्रसिध्द झालेल्या पहिल्या आवृत्तीचाच विचार केला जाईल. लेखकाने 2 प्रती पाठवणे आवश्यक आहे. साहित्य कृती पूर्णपणे स्वरचित असावी. अनुवाद चालणार नाही. ही अट संकीर्णमधील अनुवादित साहित्याला लागू नाही. लेखकाने आपले साहित्य 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठवावे त्यानंतर आलेल्या पुस्तकांचा विचार केला जाणार नाही. पुस्तके नंदकुमार सावंत, 702, मंगळवार पेठ, सातारा. येथे पाठवावीत. अधिक माहितीसाठी नंदकुमार सावंत 9422604509 यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!