हरित वसुंधरा लघुपट महोत्सवानिमित्त प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । सातारा । वनविभाग आणि संस्कृती फाऊंडेशन तर्फे “हरित वसुंधरा लघुपट” महोत्सवानिमित्त    पर्यावरण संवर्धन, निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप, पर्यावरण संरचना, टेकड्यांचे  संरक्षण अशा विविध विषयांवरील लघुपट, बायोग्राफी, डॉक्युमेंट्री, ॲनिमेशन  प्रवेशिका स्पर्धकांनी  दि. 26 डिसेंबर 2021 अखेर पाठविण्याचे आवाहन वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आणि फाऊंडेशनचे सचिव महेश घोलप यांनी केले आहे.

या महोत्सवात पहिल्या टप्प्यात वीस स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. यातील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे      रु. 30 हजार, रु. 20 हजार  आणि 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी www.sanskrutifoundation.in येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!