
दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल दि. 30 जून 2022 व लेखा परिक्षण अहवाल दि. 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत सादर करावेत. तसेच वार्षिक अहवालासोबत जादा पदनिर्मितिच्या आदेशाची साक्षांकित छायाप्रत जोडवी, असे आवाहन अमित सोनवणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांचे मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल व सनदी लेखापालानीं प्रमाणित केलेले लेखा परीक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयास सादर करण्याच्या तारखा विहित कलेल्या आहेत. वरील विहित मुदतीत वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्यास परिक्षण अनुदान वितरीत करण्यात येणार नाही व त्याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयांची राहील. असेही अमित सोनवणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.