
स्थैर्य, सातारा दि.30: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन शालिनी इंगोले, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
राजा राममोहन रॉय ,ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संर्पक साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे हे संकेतस्थळ पहावे योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारित स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी /हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 8 जानेवारी 2021 पर्यत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.