नागरी नोंदणी पद्धतीअंतर्गत जन्म नोंदणीमध्ये बाळाचे नाव समाविष्ट करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली असेल व जन्मनोंदणी होऊन 15 वर्षे पूर्ण झाली असतील, त्या नागरिकांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करुन घ्यावी. यामध्ये सन 1969 पूर्वीच्या जन्म नोंदणीचा सुद्धा समावेश आहे. अशा नावाची नोंदणी 27 एप्रिल 2026 पर्यंत करता येईल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाची नोंद करता येणार नाही. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथेच नागरिकांनी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!