दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । सातारा । कोयना, वांग, उत्तारमांड, उत्तरवांग नदीवरील ल.पा. प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारक शेतकरी ग्राहक ज्यांना सिंचनासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो. यामधील शेतकरी ग्राहक यांची पाणीपट्टी थकबाकी रक्कम 10 हजार पेक्षा जास्त आहे अशा सर्व लाभधारक शेतकरी ग्राहक यांच्यावर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आकारणीचा बोजा चढविण्याची कार्यवाही महसूल व जलसंपदा विभागाकडून प्रास्तावित करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित लाभधारक शेतकरी ग्राहक यांनी शासनाच्या महसूलामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने पाणीपट्टी थकबाकी रक्कम तात्काळ भरुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.