कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ११: मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. 13 किंवा 14 मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी  जिल्ह्यात रमजान ईद हासण अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि. 13.5.2021 रोजीचे 0.00 वा. पासुन ते दि. 14.5.2021 राजेचे 14.00 वा.पर्यंत  पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ब्रेक  द चेन आदेशचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागे एकत्र येऊ नये. तसेच दि. 20 एप्रिल, 9 मे व 14 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशांचे तंतोतंत पालन करने बंधनकारक राहील. रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीया कालावधीत नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणूका, धार्मिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशीसोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भव रोखण्यासाठी  शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 20054 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसर दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!