दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील निर्जन रस्त्यावर पोलीस असल्याचे खोटे सांगून फसवणूक करण्यात येत आहे. अशा लोकांपासून नागरिकांनी दूर रहावे. तसेच याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहर आणि परिसरातील निर्जन रस्त्यावर काही दिवसांपासून वृध्दांना बाजुला घेऊन आम्ही पोलीस आहोत, पुढे दंगा झाला आहे. तपासणी सुरु असून तुमच्याजवळील सोन्याचे दागिने द्या, असे काही व्यक्त म्हणत आहेत. नंतर या व्यक्ती हातचलाखीने बनावट दागिने दुसऱ्यांच्या हातात ठेवण्याचा प्रकार होत आहे. संबंधित संशयित हे दुचाकीचा वापर करत असून अंगाने मजबूत आहेत. अशा संशयास्पद वाटणाऱ्या लोकांचा फोटो, व्हिडिओ काढून ठेवावा. तसेच याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.