शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कामांकरीता पूर्वनियोजित वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे दि.20 : राज्यामधील कोरोना परिस्थिकतीचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशास अनुसरुन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालया अंतर्गत  असणा-या शिबिर कार्यालयाकडील कामे वगळता उर्वरित सर्व कामे शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणी इत्यादी कामे  22 जून 2020 पासून शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करुन सुरु करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अनुज्ञप्ती विषयक आगाऊ वेळ घेऊनच  अर्जदाराने यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दोन अर्जदारामध्ये किमान 6 फुटाचे अंतर राखणे बंधनकारण आहे, शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीचे वेळी संगणक / किबोर्ड आणि पक्की अनुज्ञप्ती चाचणी वेळी वापरण्यात येणारे वाहन प्रत्येक वेळी सॅनिटाइज केल्याची खातरजमा केल्यानंतरच चाचणी घेण्यात येईल. अर्जदारांना मास्क व हॅडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. कार्यालयामध्ये सॅनिटायजरचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे त्याचा वापर करण्याबाबत तसेच  22 जून 2020 रोजी सकाळी 8.00 वा.पासून पूर्वनियोजित वेळ घेऊन Slot Book  करण्याचे तसेच पूर्वनियोजित वेळेनुसार चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन  पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!