दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । सन 2022-23 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून आपला मागणी अर्ज दि. 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.