दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । सातारा । जिल्हयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातील यापुर्वी कार्यरत असलेल्या पॅनेलला बरखास्त न करता नवीन 20 निवड यादी व 3 प्रतिक्षा यादी असे एकूण 23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे नवीन पॅनेल तयार करण्यासाठी अटी व शर्तींच्या अधिन राहून इच्छुक व पात्र उमेदवारांनी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समितीमार्फत करण्यात आले आहे.
पदाच्या भरतीबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या अधिकृत संकेतस्थळ www.satara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुना अर्ज डाउनलोड करून घ्यावा.
भरतीबाबतची माहिती सातारा शहर व तालुकास्तरीय सर्व न्यायालये व वकील संघाचे नोटीस बोर्ड, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांचे सूचना फलकांवर लावण्यात आलेली आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात येणाऱ्या पॅनेलवरील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता यांचे कार्यालय, सातारा, जिल्हा व सत्र न्यायालय इमारत, तळमजला, सदरबझार, सातारा – 415001 यांच्या कार्यालयात समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीट पोस्टाने पोहचतील अशा रितीने पाठवावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.