साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे दि. 05 : सन 2019-20  या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय  व अभियांत्रिकी इ.अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील मांग, मातंग, मिनी मादिग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा इत्यादी विद्यार्थी / विद्यार्थींनींना महामंडळाकडुन ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम  3 ते 5 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधींच्या अधीन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. याकरीता 10 ऑगस्ट 2020 पर्यंत संपुर्ण कागदपत्रानिशी जिल्हा कार्यालयास संपर्क करुन खालीलप्रमाणे कागदपत्रे दोन प्रतीत सादर करावीत.

जातीचा दाखला, फोटो, मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा अर्ज सोबत कार्यालयास अथवा ईमेलवर स्कॅनकरुन स्वस्वाक्षरीने पाठविण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंहामंडळ मर्या, पुणेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!