दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | सातारा | केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत खेलो इंडिया योजनेतून सातारा जिल्ह्यामध्ये मैदानी खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तात्पुरत्या स्वरुपात प्रशिक्षक नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवार दि.18 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात समक्ष सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व अर्हतासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा तसेच श्री. सुहास व्हनमाने, तालुका क्रीडा अधिकारी मो. नं. 7875326326, श्री. अनिल सातव क्रीडा मार्गदर्शक मो.नं.9623945371 यांच्याशी संपर्क साधावा असेही श्री. नाईक यांनी कळविले आहे.