हातमाग तंत्रविज्ञान संस्थेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर दि.18 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील  सन 2020-2021 शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका  अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) – 13 व वेंकटगिरी- 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग  आयुक्तालयाचे वेबसाईट  http//www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग  यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग  आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी कळवले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!