
दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । सातारा । टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणुक प्रवर अधीक्षक डाकघर, सातारा यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रवर अधीक्षक डाकघर, सातारा यांच्याकडे 22 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावेत.