दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये विनामूल्य प्रवेश अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2021 अखेर वाटप सुरू असून. विद्यार्थी व पालकांनी प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्हयातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8 ते 10 वी, 11 वी व पदवीच्या पहिल्या वर्षे, पदव्युत्तर व व्यावसायिक पदवी या अभ्यासक्रमासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील रिक्त जागेवरती प्रवेश देण्यात येतो.
तसेच सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित होते. ते आता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात प्रवेशित आहेत अशा विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश अर्ज भरून घेण्यात येवुन गुणवत्ते नुसार प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना नियमानुसार देय असलेल्या निवास, भोजन इत्यादी सोई-सुविधा तसेच अभ्यासक्रम पुर्ण करीत असलेल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेल्या उदा. गणेवश, स्टेशनरी व क्रमिक पुस्तके मोफत पुरविली जातात. तसेच विद्यार्थ्यांना दरमहा रू. 500/- व मुलींना रूपये विशेष भत्तासह रूपये 600/- दरमहा निर्वाहभत्ता दिला जाणार आहे.
अधिका माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003, दुरध्वनी क्रमांक 02162298106 येथे संपर्क साधावा.