सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील पुनर्वसनाचा लाभ न घेतलेल्या खातेदारांना आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । सातारा । सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमध्ये जिल्ह्यातील एकूण 52 गावांचे क्षेत्र समाविष्ट आहे. यापैकी 15 गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करावयाचे आहे. त्यानुसार या गावांची पुनर्वसन प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. पुनर्वसन प्रक्रियेमध्ये मौजे डिचोली, पुनवली ता. पाटण व मौजे रवंद, आडोशी, माडोशी, कुसापूर, खिरखिंडी, वेळे ता. जावळी या गावांचा समावेश आहे. या गावांतील खातेदारांची संकलन यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन यांच्यामार्फत तयार करण्यात आली आहे. या संकलनानुसार मुळ गावात वास्तव्यास नसलेल्या 147 खातेदारांनी पुनवर्सनाचा लाभ घेतलेला नाही किंवा कोणतीही मागणी अथवा संपर्क केलेला नाही. पुनर्वसनाचा लाभ न घेतलेल्या खातेदारांनी पुनर्वसनी कामी उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव  कराड किंवा उपवनसंरक्षक (प्रा) सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य लेखापाल उप वन संरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, सातारा यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!