स्थैर्य, सातारा ,दि.२६ : दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक/त्यांच्या विधवा, ज्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्याकडून दरमहा रुपये 6000/- एवढे अनुदान पाठविले जाते, त्या सर्व लाभार्थ्यांनी माहे ऑक्टोबर 2020 चे अनुदान घेतेवेळी हयातीचे दाखले संबंधित बँकेत भरुन द्यावेत, म्हणजे संबंधित बँका हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडे पाठवून देतील, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
माहे नोव्हेंबर 2020 अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्याचे हयातीचे दाखले प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2020 नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.