जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । सातारा । जिल्हा माहिती कार्यालयातील मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिके, साप्ताहिके व इतर किरकोळ जमा झालेली रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी ज्यांना वृत्तपत्राची रद्दी घ्यावयाची आहे त्यांनी आपली दरपत्रके दि. 25 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात द्यावीत. लिफाफ्यावर ‘रद्दीसाठी दरपत्रके’ असा उल्लेख असावा. मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, सातारा यांनी केले आहे. दरपत्रके पाठविण्यासाठी कार्यालयाचा पत्ता : जिल्हा माहिती अधिकार, जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सातारा – 415001 कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : 02162-237440, 237441 असा आहे. वरील पत्त्यावर दरपत्रके पाठवावीत. दरपत्रके स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हे कार्यालय राखून ठेवीत आहे.


Back to top button
Don`t copy text!