
दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। सातारा । जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फत प्रस्ताव स्विकृती व त्रुटीपूर्तता शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी विज्ञान शाखेतील शिक्षण घेतल असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य रविंद्र कदम यांनी केले आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या इयत्ता 11 वी / 12 वी विज्ञान अभ्यासक्रमात शिकत असताना प्राप्त करण्याकामी योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत समितीस जास्तीत जास्त संख्येत सादर करावेत.
तसेच 2025-26 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणा-या सर्व मागासवर्गीय अनुसुचित जाती , भटक्या जमाती , विमुक्त जाती , इतर मागासवर्ग , विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्वरित जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी समितीस प्रस्ताव सादर केले आहेत, परंतु अद्याप त्रुटींची पुर्तता केली नसल्याने प्रकरण प्रलंबित आहे अशा सर्व प्रस्तावधारक यांनी समिती कार्यालयास सर्व आवश्यक मुळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित त्रुटींची पुर्तता करावी जेणेकरून समितीस आपले प्रस्तावावर विहित कालमर्यादेत कागदोपत्री पुराव्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल, असेही रविंद्र कदम यांनी कळविले आहे.