स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध स्पर्धांचे आवाहन : मुख्याधिकारी संजय गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । फलटण नगरपरिषद, कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि आरोहणम यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2022 नागरिकांचा सहभाग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहीती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांंनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता फलटण नगरपरिषद, कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि आरोहणम संस्था संयुक्तपणे स्वच्छ सर्वेक्षण 2022 नागरिकांचा सहभाग स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असेल ज्या मध्ये जिंगल लेखन, लघुपट/ शॉर्टफिल्म,भित्तीचित्र / म्युरल्स, पोस्टर डिझाइन, पथनाट्य, आणि उखाणा अशा सहा प्रकारात स्पर्धा होणार आहेत.

सर्व स्पर्धांचा कालावधी हा 06 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 असा असेल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम येणा-या तीन क्रमांकास आकर्षक रोख बक्षिसे व प्रशस्तिपत्रे देण्यात येतील. आयोजकांनी नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेत जमा होणारे सर्व साहित्य जिंगल्स, मुव्ही, पोस्टर्स, पथनाट्य शुटींग, उखाणा यावर नगरपरिषद, कमिन्स, अरोहणम यांचा अधिकार राहील. या साहित्याचा वापर नगरपरिषद शहरात जनजागृती करण्यासाठी करेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धक अधिक माहितीसाठी आरोहणम प्रतिनिधी श्री. मनीष काकडे (मो.8793302203)/सचिन काळुखे (मो.7743977977) यांना संपर्क साधू शकतात.

सदर स्पर्धांकरीता प्रवेश विनामुल्य राहील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या प्रवेशिका, नोंदणी गुगल फॉर्म साठी लिंक –
https://forms.gle/CzXrSUZDYgsu1d3j6 वर पाठवता येईल. सर्व स्पर्धेचे विषय – स्वच्छता विषयक जनजागृती, कचरा वर्गीकरण, खतनिर्मिती , परसबाग, परिसर स्वच्छता प्लास्टिक बंदी, पर्यावरणपूरक उत्सव इत्यादी राहतील.

या स्पर्धा सर्व वयोगटांकरिता खुली असून शहरातील सर्व नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होवून स्वच्छता विषयक जनजागृती मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांंनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!