दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । पाटण तालुक्यातील मारुल हवेली व चाफळ येथील रास्त भाव धान्य दुकानांसाठी 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत तहसीलदार, पाटण यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी झालेली संस्था व महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिला सहकारी संस्था यांना रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, पाटण येथे संपर्क साधावा.