पंढरपूर येथील पालवी संस्थेला आर्थिक मदतीचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। फलटण । पंढरपुर येथील पालवी संस्था अनाथ लोकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या संस्थापक सौ. मंगल शहा आहेत. या संस्थेत अनाथ लोकांची राहण्याची उत्तम सोय करण्यात येते. या संस्थेतील अनाथ मुलांची सहल पुणे, लोणावळा परिसरात जाणार आहे. सहल परत येताना गुरुवार दि. 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजता फलटण येथे येणार आहे.
जैन सोशल ग्रुपमार्फत 100 मुलांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी अनाथ मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या संस्थेस आर्थिक मदत करण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन जैन सोशल ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!