दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग अंतर्गतच्या फलटण येथील शासकीय मुलांचे वसतिगृहात 2022-2023 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून विद्यार्थींनी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.
या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग, अनाथ प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेशित विद्यार्थींना निवास व्यवस्था, भोजन, क्रिमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, छत्री, रेनकोट विनामुल्य पुरविण्यात येत. तसेच विद्यार्थ्यांना 500 रुपये दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. वसतिगृहातील रिक्त जागेवर इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. प्रवेशाचे अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.