दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या अधिपत्याखाली सैनिक मुला-मुलींचे वसतिगृहामध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु आले असून 23 मे 2022 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रथम फेरीकरीता प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 देण्यात आली होती. परंतु विद्यालयातील, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया उशिरा चालू होत असल्याने अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सर्व युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा. शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.