मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर आवाहन : ‘माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल तर…’ संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१: वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीड तालुक्यातील केतुरा येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यानंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचे आवाहन केले आहे.

संभाजीराजेंनी तरुणांना आत्महत्या करू नयेत असे आवाहन केले आहे. तसेच तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? असंही त्यांनी विचारले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या केली. या घटनेवर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, ‘एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावे, मरून जगावे” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!’

चिठ्ठी व्हायरल


विवेकच्या आत्महत्येनंतर समाज माध्यमांवर एक सुसाईड नोट व्हायरल झाली आहे. यात आपण मराठा सामजाला आरक्षण नसल्याने वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरत नसल्याने समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांत अशी कुठली नोंद नाही. नतेवाईकांनीही तशी माहिती दिलेली नाही. मृतदेहाच्या पंचनाम्यात अशी कुठली चिठ्ठी आढळून आली नव्हती अशी माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!