दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । सातारा। ०१ जुलै २०२२ पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. या अंतर्गत दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक वस्तुओपर रोक’ हे हिंदी नुक्कड नाट्य तयार करून ३० जून रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज येथील कर्मवीर पुतळ्यासमोर ,तसेच यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पोलीस चौकी रोड येथे त्याचे सादरीकरण करून जनजागृती केली. सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो.अशा प्रकारच्या वस्तू
वापरण्यावर बंदी घालण्यात आल्याचे या नाटकात सांगण्यात येते .प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक ,प्लास्टिकचे झेंडे कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक थर्माकोल (पॉलिस्ट्रिन) ,प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास,चमचे, चाकू स्ट्रॉ ,ट्रे मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा
प्लास्टिकचा कागद ,इन्विटेशन कार्ड ,सिगरेटचं पॅकेट 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या बंद करण्यात आल्याचे नाट्य संवादातून सांगितले जाते.. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट
2021 रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर लगेच सावधान होत विद्यार्थी ,नागरिक,पालक सर्वाना जागरूक करनारे हे नाटक हिंदीत सादर केले जात असून कळेल अशा पद्धतीने अभिनय आणि संवाद विद्यार्थी करीत आहेत. या शाळेतील नववी वर्गातील विद्यार्थी समिधा भोकरे ,साक्षी शेलार ,जिया करपे ,आदिती कुलकर्णी,नेत्रा घाडगे ,वेदिका सोनटक्के ,सर्वेश भिडे,आदित्य घाडगे ,मानस पवार ,स्वरूप कांबळे ,वैभव पाटील हे विद्यार्थी आत्मविश्वासाने अभिनय करीत विषय उभा करीत आहेत .छत्रपती शिवाजी कॉलेजवर त्यांनी हे पथनाट्य उत्तम सादर केल्याबद्दल उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी यांनी त्यांचे कौतुक केले. साताऱ्यात तसेच जिल्ह्यात कदाचित समयसूचकतेने व जाणीवेने केलेले हे विषयाशी सबंधित पहिलेच पथनाट्य असेल ज्याने व्यापक जनजागृती होईल,शासन व प्रशासन देखील या जागृती कार्याचे कौतुक करून सहकार्य करील’ असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. या पथनाट्यासाठी आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका लीना कदम,अनिता घाडगे,क्रीडा शिक्षक राहुल सावंत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मेघा पवार व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पथनाट्य सादरीकरण करतेवेळी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ.रामराजेमाने देशमुख, प्रा.डॉ.सवितामेनकुदळे,प्रा.तानाजीदेवकुळे,डॉ.आर.पी.भोसले ,प्रा.डॉ.बाबासाहेब कांगुणे,प्रा.अभिमान
निमसे,इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.