माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , सातारा , दि.22: वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, यावर सुनावणी गुरुवारी (दि. 21) सुरू असताना यातील माफीचा साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला अचानक चक्कर आली. त्यामुळे कोर्टाचे काम पंधरा मिनिटे थांबवण्यात आले. यानंतर कोर्टाने तब्येतीची विचारपूस करून पुन्हा सुनावणी सुरू केली.
डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील अनेकांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने सहा मृतदेह धोम धरणालगत असलेल्या फार्म हाऊसमध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्या नंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्याकांड केला याचा पाढा वाचला.
या उलट तपासणीत संतोष पोळ याने जे सहा खून केले ते कशा पध्दतीने केले त्याची सविस्तर माहिती मांढरे हिने उलट तपासणीत दिल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. घोटावडेकर हॉस्पीटलमध्ये कंपाउंडर म्हणून कामाला होता. मात्र वैद्यकीय जुजबी ज्ञानामुळे तो पंचक्रोशीत डॉ. पोळ म्हणून प्रसिद्ध होता, असे ज्योती मांढरे हिने न्यायालयासमोर सांगितले. अजून काही महत्वाच्या उलट तपासणी होणार असून बराच काळ हा खटला चालणार असल्याचे उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सातारा जिल्हा न्यायालयात सध्या याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. दरम्यान ज्योती मांढरे न्यायालयात असताना तिला अचानक चक्कर आली. ज्योतीला पाणी देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आले. कोर्टाने 10 मिनिटांचा ब्रेक घेत ज्योतीने पुन्हा ठीक असल्याचे सांगितल्यानंतर कोर्ट कामकाजाला सुरुवात झाली.

Back to top button
Don`t copy text!