कोळकीच्या सरपंचपदी सौ. अपर्णा पखाले


दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अपर्णा विक्रम पखाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोळकी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ. सपना कोरडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये सरपंच पदासाठी सौ. अपर्णा विक्रम पखाले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोळकीचे मंडलाधिकारी नामदेव नाळे यांनी कामकाज पाहिले. यावेळी कोळकीचे तलाठी सचिन शिरसागर तर ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!