
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण येथील श्रीमती अनुराधा (काकी) अरविंद शहा वडूजकर (अजय, अनुप व राणी यांच्या मातोश्री) यांचे आज, रविवार, सायंकाळी ६.३५ वाजता समाधीपूर्वक निधन झाले.
तत्पूर्वी, आज सकाळी सात वाजता त्यांना जैन भगवती दीक्षा देण्यात आली होती. दीक्षेनंतर त्यांचे ‘श्री १०५ प. पू. शांतिमती माताजी’ असे नामकरण करण्यात आले. दिवसभर नमोकार मंत्राच्या उच्चारात त्यांची साधना सुरू होती, जी सायंकाळी शांततेत संपन्न झाली.
त्यांची अंत्ययात्रा उद्या, सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता लक्ष्मी नगर येथील अनुप शहा वडूजकर यांच्या निवासस्थानावरून निघेल. फलटण-सातारा रस्त्यावरील हरण टेकडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.