
दैनिक स्थैर्य । 2 जून 2025। बारामती । येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय येथे तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम सांगण्यात आले व तंबाखू खाणार नाही व इतरांना खाऊ देणार नाही सामाजिक प्रबोधन करू यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली.
या प्रसंगी मनोविकृती विभाग प्रमुख डॉ. संताजी शेळके,डॉ. प्रशांत झलक, किरण घुगे, समाजसेवा अधीक्षक विनायक साखरे, संध्या नाईक, रत्नमाला पवार, भगवान गिरासे, सरिता गोली, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, रुग्ण व विभागीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

