
स्थैर्य, मुंबई, दि.१२: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह
राजपूतसोबत त्याच्या पहिल्या ‘काय पो छे’चित्रपटात काम केलेल्या अभिनेते
आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 53 वर्षीय बसरा यांनी
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेतील मॅक्लोडगंजमध्ये एका कॅफेजवळ आत्महत्या
केली. त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने गळफास घेऊन
जीवन संपवले. अद्याप आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
5 वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये राहत होते आसिफ
पोलिसांनी
आसिफ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. एसपी विक्रांत
रंजन यांनी सांगितले की, पोलिस प्रत्येक अँगलने तपास करत आहे. आसिफ अंदाजे 5
वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका किरायाच्या घरात परदेशी तरुणीसोबत
लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन
चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, ज्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने
आसिफ यांनी आत्महत्या केली, तो कुत्राही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
या चित्रपटात आसिफ यांनी काम केले
आसिफ
1998 पासून चित्रपटात अॅक्टीव्ह होते. त्यांनी ‘वो’ (`1998) ‘ब्लॅक
फ्राइडे’ (2004), ‘जब वी मेट’ (2007), ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ (2010),
‘क्रिश 3’ (2013) आणि ‘हिचकी’ (2018) सह अनेक चित्रपटा सहाय्यक
अभिनेत्याच्या भूमिकेत काम केले आहे. तसेच, ‘होस्टेजेस’ आणि
‘पाताललोक’सारख्या हिट वेब सीरीजमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत.