रहिमतपूर परिसरात कोरोना व्हायरस चा आणखी एक दणका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, रहिमतपूर, दि. १६ (अविनाश कदम) : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे ठाणे (मुंबई) येथून आलेले  65 वर्षीय पुरुष, तसेच चोरगेवाडी येथे अहमदाबाद येथून आलेले 60 वर्षीय पुरुष यासह  दररोज  सातारा येथून नोकरी  निमित्तानं  कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात येणारी 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी अशा तिघां जणांसह आज अनपटवाडीतील वृद्ध महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी पवारवाडी व चोरगेवाडी येथे कंन्टेंमेंट झोन जाहिर केला असून  घरपोच सुविधा आदेश लागू केला आहे.

पवारवाडी व चोरगेवाडी येथे  कोरोना बाधीत रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने त्यांच्या वर तातडीने दक्षता घेण्यात आली होती. माञ सातारा येथून नोकरी  निमित्तानं दररोज  कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात येणारी 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी हीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  प्रशासकीय  यंञणा अलर्ट झाली आहे.

पवारवाडी येथील कोरोना बाधीत संबंधित  65 वर्षीय पुरुष व त्याच्या कुटुंबातील अन्य तिघे असे एकुण चार व्यक्ती ठाणे मुंबई येथून पाच दिवसा पुर्वी गावी आले होते.सतर्क असणाऱ्या ग्रामस्तरीय कमिटीने अगोदरच शाळेत क्वारंटाइन करुन ठेवण्याची दक्षता घेतलेली होती. संबंधित रुग्णाला ञास सुरु होताच वाठार किरोली प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असिफ जमादार, अनिरुद्ध माने, उद्धव राऊत, विजय माळवदे यांनी तात्काळ आरोग्य पथकासह घर टू घर सर्वे करुन संबंधित रुग्णाला कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाब घेण्यास पाठविले.तेथून ब्रम्हपुरी विलगीकरण कक्षात ऍडमिट केले होते. त्याचा आज पॉझिटिव्ह अहवाल येताच त्याला सातारा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ नेले असून कुटुंबातील तीन जणांना ग्रामीण रुग्णालयात स्वाब घेवून त्यांना ब्रम्हपुरी विलगीकरण कक्षात ऍडमिट केले.

चोरगेवाडी येथील 60 वर्षीय नागरिक अहमदाबाद येथून पाच दिवसापुर्वी गावी येताना बोरगाव येथील नागरिकाच्या दुचाकीवरुन गावी पोहोचले होते. त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांच्या कुटुंबातील दोघे, दुचाकीस्वार यासह अन्य दोन असे एकुण पाच जणांना ब्रम्हपुरी रहिमतपूर येथील विलगीकरण कक्षात ऍडमिट  केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी अमर निंबाळकर यांनी दिली.

ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक युवराज कर्पे यांनी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी हीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  त्यांना अधिक उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले . तसेच संबंधित महिलेची  हिस्ट्रीसीट मधील निकटतम सहवासीत आलेल्या चार रुग्णांची माहिती घेतली. त्या निकटसहवासिता पैकी ग्रामीण  रुग्णालयात ऍडमिट  असणाऱ्या एका  महिलेसह अन्य तीन जणांना योग्य ती खबरदारी घेवून क्वारंटाने करुन आज  मंगळवारी सकाळी त्यांचा स्वाब घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या आकरा कर्मचाऱ्यांची लो रिस्क असली तरीही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे वाठार किरोली प्रा. आ. केंद्राच्या अंतर्गत पवारवाडी व चोयगेवाडी ही दोन्ही गावं येत असल्याने  ग्रामस्थांनी भिती बाळगू नये. तसेच दोन्ही गावातील नागरिकांनी  आरोग्य पथकाच्यावतीने सुरु असणाऱ्या  घर टू घर सर्वेला सहकार्य करावे असे आवाहन  वैद्यकीय अधिकारी असिफ जमादार, अनिरुद्ध माने, केले आहे. तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग सहाय्यक उद्धव राउत व  विजय माळवदे यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!