
स्थैर्य, दि.१९: जरनसृष्टीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. दाक्षिणात्य टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सबरी नाथ यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी ते 43 वर्षांचे होते. मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत असताना अचानक त्यांना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना त्रिवेंद्रम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सबरी नाथ हे छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता होते. मिन्नूकेट्टू या मल्याळम मालिकेतून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी सबरीनाथ अमाला, स्वामी अयप्पन आणि श्रीपदम यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. सध्या ते पॅनकिली या मालिकेत काम करत होते. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.