स्थैर्य, सातारा, दि. 1 : मंगळवारी रात्री उशीरा मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (खङख) 1 असा एकूण 48 नागरिकांचा तसेच सकाळी आलेल्या अहवालानुसार उपचार घेत असलेल्यांचे निकट सहवासित 10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय 2 असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.
जांभ येथील बाधिताचा मृत्यू
दरम्यान, आज पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तो कोरोनाबाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
काल रात्री आलेल्या अहवालानुसार बाधितांमध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22, 54, 32, 40, 35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23, 45, 70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36, 34 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती, पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कानरवाडी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
298 जणांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह
एन.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 298 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडीकर यांनी दिली.
क्षेत्र माहुली येथील 3 जणांना डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय 2 असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल आज सकाळी कोरोनाबाधित आला आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला, माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी, वाई तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
3 जणांना डिस्चार्ज
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
घेतलेले एकुण नमुने 13533
एकूण बाधित 1107
घरी सोडण्यात आलेले 743
मृत्यू 46
उपचारार्थ रुग्ण 318.