दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना नुकतेच एक निनावी पत्र मिळाले आहे. सदरील पत्रामध्ये काही चुका, काही सूचना, बरंचसं समतोल राखून राजकारण व विकास या संबंधित निनावी पत्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मिळाले आहे. सदरील पत्राच्या अनुषंगाने “कृपया फोन करावा अथवा भेटावे; प्रतीक्षा करत आहे. काळजी नसावी” असे मत सुद्धा श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले आहे.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते असणाऱ्या दिपक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यानंतर राजे गट राजकीय दृष्ट्या फारसा सक्रिय दिसत नाही. या उलट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गट मात्र राजराणात बेरजेचे राजकारण करीत आहे. अशामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना एका हितचिंतकाने निनावी पत्र लिहून राजकारणामधील चुका व पुढील राजकारणाबाबत दिशा दिली असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे ज्यांनी पत्र लिहले आहे; त्यांना पुढीलप्रमाणे आवाहन केले आहे.