दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) गावच्या जानुबाई देवीची वार्षिक यात्रा बुधवार, दि. १२ व गुरुवार, दि. १३ एप्रिल रोजी होणार आहे.
बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी गावच्या वतीने दुपारी ४.०० वाजता देवीला साडीचोळी अर्पण करण्यात येईल. त्यानंतर बकरी, सायंकाळी ७.०० वाजता सासनकाठ्या गोळा करणे, जोतिबाला हळद लावणे, संध्याकाळी ९.०० वाजता बारामती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम व पहाटे देवीचा छबिना निघणार आहे.
गुरुवारी सकाळी १०.०० वाजता आनंद जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. सायं. ५.०० वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होऊन यात्रेची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ राजाळे व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी व नाईक निंबाळकर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.