दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 01 : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाची वार्षिक सभा राज्यपाल तसेच केंद्राचे अध्यक्ष भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल माधमातून संपन्न झाली. यावेळी केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, २०१८-१९ वर्षासाठी वार्षिक लेखे व प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली.

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिक्षेत्रात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्र ही राज्ये येतात. केंद्राच्या माध्यमातून लोककला, आदिवासी कला, ललित कला व हस्तकलेच्या प्रसार व संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!