दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) शिक्षण संस्थेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या तांत्रिक विभागात मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी संस्थेच्या सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांनी सर्वांचे स्वागत करून सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे यांनी भूषवावे, अशी सूचना मांडली. त्यावर सभासद ताराचंद जगताप यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील व अन्य संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संस्थेच्या सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांनी विषय पत्रिकेवरील एकेक विषय चर्चेसाठी मांडला. त्यामध्ये मार्च २०२३ अखेर प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक यांची जमा-खर्चाची पत्रके मंजूर करणे तसेच या विभागांचे सन २०२३-२४ साठीचे अंदाजपत्रक मंजूर करणे, ४ मार्च २०२० रोजी संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा विषय क्र. ३ चे ठराव क्र. ३ संस्थेच्या घटना दुरूस्तीचा ठराव या सभेत मंजूर करणे, हा विषय मागील दोन वार्षिक सभेत मंजूर झाला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे, इतर विषय असे एकूण दहा विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
समारोप भाषण करताना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले की, कै. माधवराव आमटे यांनी स्थापन केलेली संस्था आजही जिल्ह्यात नावलौकीक कायम राखेल, याची ग्वाही दिली.
यावेळी संचालक राजेंद्र भोसले, राजेंद्र शेवाळे यांच्यासह संस्थेचे सभासद, निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सुनील भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.