दैनिक स्थैर्य | दि. १४ डिसेंबर २०२४ | फलटण | येथील कोळकीमध्ये असणाऱ्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव व मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांची उपस्थिती राहणार आहे.
दि. १५ डिसेंबर रोजी प्री – प्रायमरी व प्रायमरी विभागाचे वार्षिक समारंभाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत.
दि. १६ डिसेंबर रोजी इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले व पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी विद्यार्थी, पालक, नागरिक व हितचिंतकांनी दि. १५ व १६ रोजी कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित रहावे; असे आवाहन सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी केले आहे.