दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अशा शिक्षकांना जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
सदर कार्यक्रमामुळे शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्यामध्ये अधिक जोमाने काम करण्याची इच्छा निर्माण होते. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक च्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरावर आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानपूर्वक सदर पुरस्कार प्रदान केले जातात. सन 2022- 23 मधील प्राप्त प्रस्तावांमधून समितीमार्फत मूल्यांकन करून गुणांकनाच्या आधारे प्रत्येक तालुक्यातून एक अशा एकूण 11 शिक्षकांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तर एका शिक्षकाचे विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.चालू वर्षी खालील शिक्षकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संदीप आत्माराम किरवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ (जावली), मनीषा शंकर रामगुडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज मुली (कराड), नूरजहा लियाकत काळजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवळ (खंडाळा), ज्ञानेश्वर श्रीरंग धायगुडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर (खटाव), चंद्रकांत दगडू चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिचुकले (कोरेगाव), संजय राजाराम कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंगर (महाबळेश्वर), सुलभा तानाजी सस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकबोंमवाडी (फलटण), दयाराणी विलास खरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणगंगा नगर (माण), रमेश एकनाथ जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुसाळे (पाटण), बाळकृष्ण वसंतराव जगताप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड (सातारा) रवी भगवान ओव्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभेपुरी (वाई)राजेंद्र पांडुरंग वाकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवडे (पाटण विशेष पुरस्कार) यांचा समावेश पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.